भावना आणि व्यावहारिकता
भावना आणि व्यावहारिकता मनात घर करून राहतात, भावना आणि व्यावहारिकता, भावनेला पसारा आवरत नाही, व्यावहारिकतेला पसारा करवत नाही, भावना बाहेरून कुणाला दिसत नाही, आणि व्यावहारिकता लपवता येत नाही, दोन्ही राहतात मनात नेहमी दोन ध्रुवांवर, म्हणून कधीच नांदत नाहीत एकमेकांबरोबर. द्वंद्व चालूच राहतं, मागं कुणी घ्यावं, थोडसं भावनेन समजून घ्यावं, थोडं व्यावहारिकतेनं पाऊल मागं घ्यावं, सुवर्णमध्य साधून मन आनंदी करावं. --------------------- अनघा